‘पुण्यात फक्त पेशव्यांचा शनिवारवाडाच नाही तर…’ ; अमोल कोल्हेंचं ट्विट चर्चेत

32

पुणे: राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे प्रशासनावर टीका केली. मात्र त्यांनी केलेली टीका नेटकऱ्यांना फारशी आवडली नसल्याचे दिसत आहे. कारण त्यांनी केलेल्या टिकेवरून कोल्हे हे सध्या ट्रोल होताना दिसत आहेत. पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच, परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा लालमहालसुद्धा आहे, असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे विमानतळावर असलेल्या पेन्टिंग्जवरून त्यांनी ट्वीट केले आहे. ही पेन्टिंग्ज पेशवेकालीन आहेत. पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच, परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही असेही डॉ. कोल्हे यांनी म्हटले. त्यांच्या या पोस्टची चर्चा सुरू आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे विमानतळावर फोटो, सेल्फी घेतला. त्यांनी पुणे विमानतळ प्राधिकरणाला पेशवेकालीन पेन्टिंग्जवरून प्रश्न उपस्थित केले आहेत.

डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच, परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा लालमहालसुद्धा आहे, सिंहगडही आहे आणि याच जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी, तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ वढू तुळापूर देखील आहे याचा पुणे एअरपोर्ट आॅथॅरिटीला विसर पडला की काय? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.