छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी होते, महादेव जानकरांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

9

मुंबई: ‘छत्रपती शिवाजी महाराज हे ओबीसी होते, कुळवाडी भूषण राजे होते’ असं वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलं आहे. त्यांच्या विधानामुळे वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे. यापुर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक निर्माण केली असे वक्तव्य केले होते. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद निर्माण झाला होता. तर आता छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी असल्याचे वक्तव्य महादेव जानकर यांनी केल्यामुळे नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्यामुळे राज्यात संतापाची लाट ओसरली आहे. तर दुसरीकडे भाजपशासीत राज्यात घटना घडल्यामुळे राजकीय आखाडा तापला आहे. अशातच भाजपच्या घटकपक्षाचे नेते महादेव जानकर यांनी गंगाखेड  इथं सुरू असलेल्या ओबीसी एल्गार आंदोलनादरम्यान सभेत शिवरायांबद्दल नवीन वक्तव्य केलं आहे.

तसेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. जानकर यांनी ओबीसी आरक्षणावरुन बोलताना आमदारावंही निशाणा साधला आहे. मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो आणि मुस्लिमांनाही आरक्षण देतो, मुस्लिमांवर अन्याय खूप आहे. कुठे गॅरेज बघितले की मुस्लिम, अंब्याचे दुकान पाहिले का मुस्लिम, कोंबडीचे दुकान मुस्लिम, त्यांचा कोणी कलेक्टर नाही. ते आपले टोपी घालून फळं विकतात आणि आपण त्यांनाच शिवी देतो. हिंदू भिकारी आणि मुस्लिम भिकारी परंतु राज्य चालवणारा तिसरा असतो ही गोष्टी लक्षात ठेवली पाहिजे असे महादेव जानकर यावेळी म्हणाले.

ओबीसी आरक्षणावरुन बोलताना महादेव जानकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी होते असे सांगितले आहे. ते म्हणाले की, प्रथम शाहू महाराजांनी ओबीसींना आरक्षण दिले. मराठ्यांना आरक्षण होते परंतु नंतर का गेले? शिवाजी महाराजही ओबीसी होते. तेव्हा काही लोकांना वाटले की, आपण मोठे आहोत आपल्याला काही गरज नाही म्हणून आम्हाला आरक्षण नको आता काय अवस्था कशी झाली आहे आपण पाहत आहोत.

Get real time updates directly on you device, subscribe now.