बॉलिवूड मधला हा अभिनेता चित्रपटापासून दुर असूनही कोट्यधीश आहे, जाणून घ्या

मुंबई: बॉलीवूड अभिनेता गोविंदा हे चित्रपटसृष्टीतील असे एक नाव आहे ज्याने आपल्या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. त्याच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच गोविंदा त्याच्या अप्रतिम नृत्यासाठी देखील ओळखला जातो. गोविंदाचा जन्म 21 डिसेंबर 1963 रोजी मुंबईमध्ये झाला. अभिनेता अरुण आणि गायिका-अभिनेत्री निर्मला देवी यांच्या पोटी गोविंदाचा झाला. गोविंदाचे वडील देखील एक उत्कृष्ट अभिनेते होते आणि जवळपास 15 वर्षे त्यांची अभिनय कारकीर्द राहिली. या काळात त्यांनी जवळपास 30 चित्रपटांमध्ये नायक म्हणून काम केले.

बॉलिवूड अभिनेता गोविंदाने अभिनयाच्या जोरावर दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्याच्या उत्कृष्ट अभिनयाव्यतिरिक्त गोविंदा त्याच्या लाईफस्टाईलसाठी देखील ओळखला जातो. गोविंदा सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे तरी सुद्धा त्याच्याकडे पैशांची कमतरता नाही. चित्रपटांशिवायही तो दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कमाई करतो. गोविंदा हा बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींपैकी एक आहे ज्यांच्याकडे भरपूर मालमत्ता आहे.

गोविंदा चित्रपटांपासून दूर असला तरी त्याच्याकडे पैशांची कमतरता नाही. 18 मिलियपेक्षा अधिक अधिक म्हणजे जवळपास 150 कोटींचा मालक आहे. गोविंदाचे मुंबई आणि आसपास 3 बंगले आहेत. गोविंदा त्याच्या कुटुंबासह जुहूच्या बंगल्यात राहतो. गोविंदा ब्रँड एंडोर्समेंट आणि रिअल इस्टेटमधून भरपूर कमाई करतो, असे सांगितले जाते.