भिवंडी : आज लोकसभेच्या भिवंडी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ भिवंडीत “कार्यकर्ता संवाद” मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मतदारांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये 10 वर्षांत केंद्र सरकारने अनेक विकासकामे केली आहेत. आणखी 5 वर्षांत जागतिक पातळीवर विकासाच्या दृष्टीने भारत अव्वल क्रमांकाचा देश असावा, यासाठी 20 मे रोजी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन या वेळी पाटील केले.
कर्नाटकच्या माजी मंत्री आमदार सौ. शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले, भाजपा भिवंडी जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, सरचिटणीस विशाल पठारे, संतोष शेट्टी, श्याम अग्रवाल, अशोक जैन, माललेशम कोक, बालमुकुंड शुक्ला, संदिप जडेजा आणि भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
Get real time updates directly on you device, subscribe now.