उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते यंदाचा शाहीर मधू कडू स्मृती नटरंग कलागौरव पुरस्कार अभिनेते भाऊ कदम यांना प्रदान

26

पुणे : शाहीर मधू कडू स्मृती नटरंग कलागौरव पुरस्कार यंदा अभिनेते भालचंद्र ऊर्फ भाऊ कदम यांना मान्यवरांच्या उपस्थितीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, मी स्वतः गिरणी कामगाराचा मुलगा असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना किती आव्हानांना तोंड देत पुढे जावे लागते, हे मला माहीत आहे. भाऊ यांनी देखील कठोर परिश्रम घेऊन आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांनी आपल्या सहज आणि निखळ अभियानाने संपूर्ण महाराष्ट्राला आपलेसे केले आहे. आजच्या पुरस्काराबद्दल पाटील यांनी भाऊंचे अभिनंदन केले. तसेच, नटरंग संस्थेचे कार्य असेच वृद्धिंगत होत राहो, यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी नटरंगच्या १५० कलाकारांचा नृत्याचा कार्यक्रम तसेच राम वंदनाने उपस्थित सार्वांचीच मने जिंकली.  हा पुरस्कार लोककलावंत मधू कडू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रदान करण्यात येतो. मधू कडू यांनी केलेल्या रंगभूमीवरील कार्यास सलाम कारण्याचाएक प्रयत्न म्हणजे हा पुरस्कार.

यावेळी संस्थेचे अध्यक्षा स्वरदा बापट, प्रिया बेर्डे, माहिती संचालक जतिन पांडे, आशा काळे, प्राजक्ता माळी, दादा पासलकर, जयमाला इनामदार, राजेश येनपुरे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.