धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चंद्रकांत पाटील यांनी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन

8
पुणे : रणधुरंधर योद्धे, स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती बुधवारी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विश्व हिंदू मराठा संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला.
सर्वप्रथम चंद्रकांत पाटील यांनी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या कोथरूडमधील निवासस्थानी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विश्व हिंदू मराठा संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. यावेळी पालखी सोहळा आणि शंखनाद आयोजित करण्यात आला होता, त्यातही पाटील यांनी सहभागी होत आनंद घेतला.

Get real time updates directly on you device, subscribe now.