पुण्यात महिला पोलीस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे: पुणे शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेतील महिला पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिल्पा चव्हाण या सध्या शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी म्हणून काम पहात होत्या. आज (शुक्रवारी) सकाळी त्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

गुन्हे शाखेत नेमणुक होण्यापुर्वी शिल्पा चव्हाण या पुणे शहर पोलिस दलातील विशेष शाखेत कार्यरत होत्या. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांची गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी पदी “नियुक्ती करण्यात आली होती. पुणे शहर पोलिस दलातील महिला पोलिस निरीक्षकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यानं शहर पोलिस दलासह संपूर्ण राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, चव्हाण यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली आहे हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.

शिल्पा चव्हाण यांनी विश्रांतवाडी परिसरातील शांतीनगर भागात राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळं प्रचंड खळबळ उडाली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!