मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना कोरोनाची लागण

28

मुंबई: गेल्या दोन वर्षांपासून करोनाविरुद्धच्या लढ्यात जिवाची बाजी लावून काम करणाऱ्या पोलिसांनाही करोनाची लागण होऊ लागली आहे. एका दिवसांत १०० पोलिस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची घटना ताजी असतानाच,सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर ठाणे जिल्ह्यातील ३९२ पोलिसांनाही बाधा झाली आहे. त्यामुळे पोलिस दलाची चिंता अधिकच वाढली आहे.

मुंबई पोलिस दलातील पोलिस उपायुक्त आणि त्यापेक्षा उच्च पदावरील सुमारे १३ वरिष्ठ अधिकारी सध्या आजारपणाच्या सुट्टीवर आहेत. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर करोनाची लागण झालेल्या कनिष्ठ पोलिसांची संख्याही वाढत आहे.

करोनाचा तिसऱ्या लाटेचा फटाका आपत्कालीन यंत्रणांना बसायला सुरुवात झाली असून, सर्वसामान्य नागरिकांशी संपर्क येत असल्याने वैद्यकीय क्षेत्राबरोबर पोलिस दलामध्ये संसर्ग प्रचंड वेगाने वाढत आहेत. राज्यात १,३०० पेक्षा अधिक पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. मुंबई पोलिस दलामध्ये तर गेल्या चार दिवसांत ५०० पेक्षा अधिक पोलिसांनी करोनाची लागण झाली आहे. दोन दिवसांत दोन पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांची चिंता वाढली आहे.

मुंबईमध्ये शहरी भाग असल्याने संसर्ग वेगाने होत आहे. सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी करोनाने बाधित होत आहेत. अतिरिक्त पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त तसेच इतर पोलिस यांना करोनाची लागण झपाट्याने होत आहे. अनेक अधिकाऱ्यांना ताप, सर्दी, खोकला जाणवत असल्याने अधिकारी आजारी सुट्टीवर गेल्यामुळे अनेक अधिकाऱ्यांची जबाबदारी दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांनी करोना प्रचंड धसका घेतला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.