प्रवीण दरेकरांना मोठा धक्का; मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे

14

मुंबई: भाजपचे प्रवीण दरेकर यांना मुंबै बॅंकेच्या निवडणुकीत मोठा धक्का मिळाला आहे. दरेकरांच्या हातून मुंबै बॅंकेची सूत्रे निसटली आहेत. भाजपविरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या खेळीमुळे मुंबै बॅंकेची सूत्रे भाजपकडून गेल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे विजयी झाले आहेत. कांबळेंच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडल्याने प्रविण दरेकरांना मोठा धक्क बसला आहे.

अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपचे प्रसाद लाड पराभूत झाले आहेत. ११ विरूद्ध ९ मतांनी विजयी झाले आहेत. उपाध्यक्ष पदामध्ये टाय झालं होतं. यानंतर ईश्वर चिठ्ठीने याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर उपाध्यक्ष पद विठ्ठल भोसले यांच्याकडे गेलं आहे. थोडक्यात अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आणि उपाध्यक्षपद भाजपकडे गेलं आहे. मुंबै बॅंकेच्या निवडणुकीत मिलिंद नार्वेकरांच्या खेळीमुळे ही संपुर्ण बाजी पलटल्याचे बोलले जात आहे. सहकार म्हणून सगळ्यांनी एकत्रित येऊन ही खेळी केली असल्याची प्रतिक्रिया भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी दिली.

मी विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता असल्यानेच महाविकास आघाडीने अशा प्रकारची खेळी केल्याचा आरोप दरेकर यांनी केला. निवडणूकीपूर्वी सर्व पक्ष एकत्र येऊन सहकारासाठी ही निवडणूक लढवली होती. पण महाविकास आघाडीमुळेच हा प्रकार घडल्याचेही ते म्हणाले. उपाध्यक्ष पदासाठी समसमान मतदान मिळाले आहे. विष्णु भोमरे यांचे मत फुटल्यानेच अध्यक्ष पद निसटल्याची कबुली त्यांनी दिली. उपाध्यक्षपद मात्र शाबुत असल्याचे ते म्हणाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री यांनी जातीने लक्ष घालून सरकार यंत्रणेचा दबाव मतदारांवर घातला. त्यामुळेच सरकारी यंत्रणेच्या वापरामुळेच मतदार फुटल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. या निवडणुकीत भाजपच्या प्रसाद लाड यांचाही पराभव झाला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.