फडवणीस महाराष्ट्र सोडून गोव्यात व्यस्त मग विरोधीपक्षनेत्याचा चार्ज कुणाकडे द्यावा? रुपाली पाटील यांचा भाजपाला टोला

26

मुंबई: उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला. विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने गोवा आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली आहे. यावरून विरोधीपक्षनेते व भाजपाचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस  यांनी शरद पवार यांना टोमणा मारला “नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष. राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा करण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी राजकारण करायला गल्लीतच यावे लागते, हेच अंतिम सत्य आहे साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचं!” आता राष्ट्रवादीतून प्रतिक्रिया उमटत आहेत.

ता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी यावर ट्वीट करत फडणवीस यांना टोला लगावला आहे. ‘महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते महाराष्ट्राच्या सोडून गोव्याच्या समस्यां मांडत आहेत. फडवणीस गोव्यात व्यस्त असतील तर विरोधीपक्षनेत्याचा चार्ज कुणाकडे द्यायला हवा? भाजपाच्या न्यायाप्रमाणे कुणाकडे द्यायला हवा.’ असा सवाल करत रुपाली पाटील यांनी खोचक टोला लगावला आहे.

काय म्हणाले होते फडणवीस?

विरोधकांचं म्हटलं तर शरद पवारांचा पक्ष असा आहे की, पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिलाया उसके जैसा…, मग ते कधी समाजवादी पार्टीशी चर्चा करतात, कधी काँग्रेसशी तर कधी टीएमसीशी बोलतात. कारण ती काही राष्ट्रीय पार्टी नाही. त्यांचं काही राष्ट्रीय अस्तित्वही नाही, त्यांचे काही राष्ट्रीय विचारही नाही. नाव राष्ट्रवादी नक्कीच असेल परंतु ती पश्चिम महाराष्ट्राची पार्टी आहे, थोडी महाराष्ट्राची पार्टी आहे.

या पेक्षा ती मोठी पार्टी नाही. त्यामुळे निश्चतच, भाजपा गोव्यात पुन्हा सरकार बनवणार आहे. राहिला प्रश्न अटीतटीच्या लढतीचा तर आम्ही कोणतीही निवडणूक हलकी समजत नाही. परंतु आता गोव्यात सगळ्यात मोठी अडचण ही आहे की, हे निश्चित होणं बाकी आहे की लढत कोणासोबत आहे. विरोधी पक्ष आपसातच स्वत:ला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे एकदा कोणासोबत लढत आहे हे जर निश्चित झालं तर त्यावर बोलता येईल. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळे गोवा विधानसभा निवडणूकीचे पडसाद महाराष्ट्रातही उमटताना दिसून येत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.