तुरुंगात टाकून झाले, आता फासावर लटकवणार असाल, तर लटकवा – संजय राऊत

खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला चोरमंडळ असा उल्लेख केल्यावरून राजकीय वर्तुळात मोठे वादळ निर्मांण झाले आहे. राऊत यांना हक्कभंग समितीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसला आजच उत्तर देण्यासाठी सांगितल्यानंतर त्यांनी म्हटले कि, तुरुंगात टाकून झाले, आता फासावर लटकवणार असाल, तर लटकवा , असे आव्हान त्यांनी दिले.
राऊत यांनी म्हटले कि, हक्कभंग नोटीस माझ्याकडे आलेली नाही. ती घरी पाठवण्यात आली आहे. सरकार बेकायदेशीर सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उद्देशून देशद्रोही असा उल्लेख केला. मी कोणत्याही प्रकारे आमदारांचा अपमान होईल, असे वक्तव्य एका विशिष्ट गटासाठी उद्देशून होते. त्यांना चोर म्हणतो. पक्षाचे नाव आणि चिन्हाची चोरी करून आपलीच म्हणून सांगणे यावरून ते वक्तव्य होते. मी हे वक्तव्य बाहेर केलं आहे. अशा लोकांना अख्खा देश चोर म्हणत आहे, असे राऊत यांनी म्हटले.
राऊत यांनी यावेळी शरद पवारांच्या भूमिकेबाबत सांगितले. पवार साहेब खूप ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना घटना माहिती आहे. जागरूक असतात. पवारांनी भूमिका मंडळी. हक्कभंग समितीमध्ये मूळ शिवसेनेचा एकही सदस्य नाही. तक्रारदारालाच न्यायाधीश करण्याचा प्रकार आहे, असे राऊत यांनी म्हटले.