चंद्रकांत पाटील यांच्या बाणेर – बालेवाडी – पाषाण परिसरातील जनसंपर्क कार्यालयाचे स्थानिक जेष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विविध माध्यमातून स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी थेट भेट हा उपक्रम सुरु केला असून कोथरूड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या निवारणासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

बाणेर – बालेवाडी – पाषाण हा परिसर देखील कोथरूड विधानसभा मतदार संघाचा प्रमुख भाग आहे तेथील ल नागरिकांच्या समस्या जलदगतीने सोडवल्या जाव्यात म्हणून नागरिकांच्या सेवेसाठी चंद्रकांत पाटील यांनी बाणेरमध्ये नवे जनसंपर्क कार्यालय सुरु केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच हे स्थानिक जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. हे कार्यालय नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कार्यरत आहे असे चंद्र्कांयत पाटील यावेळी म्हणाले. यावेळी कोथरूड मतदार संघातील नागरिक, भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील यांच्या थेट भेट उपक्रमाला रविवारी 4 दिवस पूर्ण झाले. या दरम्यान त्यांनी पाषाणमधील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना दिल्या.