पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे यांची बिनविरोध निवड

5

पुणे: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची आज निवडणूक पार पडलीय. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी जिल्ह्यातील 3 ते 4 नावं चर्चेत होती. त्यानंतर आज बँकेच्या अध्यक्षपदासाठी घोषणा झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आज पुण्यात दाखल झाले आहेत. त्यांच्यात पार पडलेल्या बैठकीनंतर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी पुरंदरचे डॉ. दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी मुळशीचे सुनील चांदेरे यांची निवड करण्यात आली आहे.

अध्यक्षपदी निवड झालेले प्रा. दुर्गाडे यांनी बँकेवर अध्यक्ष म्हणून यापूर्वी काम पाहिले आहे. बँकेच्या कामकाजाचा असलेला मोठा आवाका आणि पूर्वीच्या कामाचा अनुभव विचारात घेऊन त्यांची निवड अपेक्षित मानली जात होती. बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करूनही त्याच्या निवडीवर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केल्याचे दिसून येत आहे. तर चांदेरे यांची निवड करून तरुण चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, संचालकांच्या पहिल्या बैठकीस बँकेचे संचालक तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार, आमदार दिलीप मोहिते पाटील, काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांच्यासह संचालक उपस्थित होते. जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे १७, काँग्रेसचे २ आणि भाजपचे २ मिळून एकूण २१ संचालकांचे पक्षीय बलाबल आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.