पुण्यातील पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाबाजीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, शोधून काढू…

मुंबई: केद्रीय तपास यंत्रणेकडून देशभरात गुरुवारी महाराष्ट्रासह 12 राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर छापे टाकले होते. या कारवाईत 100 पेक्षा अधिक पीएफआय च्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर या संघटनेकडून निषधे व्यक्त करण्यात आला होता. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले आहे. मात्र पुण्यातील आंदोलनाने हिंसक वळण घेत, यावेळी त्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या आहेत. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलिस यंत्रणा त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत. असा कडक इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 24, 2022
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात बोलत असताना तेव्हा त्यांनी पुण्यातील घटनेवर जोरदार निषेध व्यक्त केला. त्यासंबंधी त्यांनी ट्विटवर देखील व्हिडिओ शेअर केला आहे. अगर नापाक इरादों से ‘पाकिस्तान ज़िंदाबाद’ के नारे लग रहे होंगे तो हम छोड़ेंगे नहीं, कार्रवाई होगी! असे त्यांनी ट्विटवर लिहले आहे.
अगर नापाक इरादों से ‘पाकिस्तान ज़िंदाबाद’ के नारे लग रहे होंगे तो हम छोड़ेंगे नहीं, कार्रवाई होगी!#pune #Maharashtra #PFI #police #action pic.twitter.com/G5HOX4uNKq
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 24, 2022