दसरा मेळाव्याच्या निकालावर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे मोठे विधान, म्हणाले….
मुंबई: शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात दसरा मेळाव्यावरुन जोरदार राजकारण बघायला मिळाले आहे. शिवाजी पार्कवर दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा होत असतोय. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे गटाने आमची खरी शिवसेना असा दावा करत, शिवाजी पार्क मैदान आम्हालाच मिळावे यासाठी आग्रही होते. त्यानंतर हा वाद मुंबई उच्च न्यायालयात गेला होता. अखेर शिवसेनेलाच शिवाजी पार्कवर परवानगी मिळाली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, दसरा मेळाव्याबाबत आता प्रश्न मिटला असून उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्क बाबत परवानगी मिळायला पाहिजे असा आग्रह होता. शेवटी त्यांना ते मिळाले आहे. तसेच बीकेसी ग्राऊंड पण मोठे आहे. शिंदे तिकडे करणार आहे. कोणी इकडे घ्या तिकडे घ्या फरक पडत नाही. निशाणीचा विषय असता तर समजू शकतो तिथं मतदान असतं. पण सभेच्या जागेसाठी भांडण असायचे कारण नव्हते, असे सुद्धा ते यावेळी म्हणाले आहेत.
तसेच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आता शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेता यावा, यासाठी शिंदे गट सर्वोच्च न्यायालायात आज याचिका दाखल करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यात यावी यासाठी सुप्रीम कोर्टाला विनंती केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.