त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचे हित आहे…..PFIवरून राज ठाकरेंचे केंद्रातील अन् राज्यातील गृहमंत्र्यांना पत्र
मुंबई: देशभरात ईडी, सीबीआय आणि एटीएस ने महाराष्ट्रासह देशातील 12 राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर छापे टाकले होते. या कारवाईत 100 पेक्षा अधिक पीएफआय च्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र पुण्यातील कारवाईनंतर पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी देशविरोधी घोषणाबाजी केल्यानं आता वातावरण तापलं आहे. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रातील अन् राज्यातील गृहमंत्र्यांना पत्र लिहले आहे.
राज ठाकरे पत्रात म्हणाले की, एनआयएने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहु अकबर अशा घोषणा दिल्या. सरकारने ह्यांना वेळीच ठेचलं पाहिजे.
ही अटक कशासाठी झाली? तर दहशवाद्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, ह्या गंभीर आरोपाखाली…थोड्यात देशद्रोही कृत्यासाठी, तरीही द्या देशद्रोहांचे समर्थन करत जर PFIच्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल तर तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेर आमच्या देशात चालणार नाहीत.
माझी केंद्रातील, राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर… आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे. @AmitShah @Dev_Fadnavis pic.twitter.com/BB88mEZ8hr
— Raj Thackeray (@RajThackeray) September 24, 2022
माझी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की फक्त ह्या देशाद्रोह्यांनाच नव्हे तर त्यांच्या ह्या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की यापुढे पाण्यासाठी देखील (पा) उच्चारता येणार नाही! नाहीतर आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. हिंदुस्थानातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहट्ट्यांच्या मुठी जर आवळल्या तर ह्या हरामखोरांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका. ह्या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल अशा शब्दात इशारा दिला आहे.