• Likes
  • Followers
  • Followers
  • Thursday, March 30, 2023

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

ऐसी मैत्री आणि मित्र होणे नाही..! दिलदार मित्र आमदार भरतशेठ गोगावले

महाराष्ट्रराजकीय
On Aug 12, 2022
Share

आजकालच्या स्वार्थी जीवनात ‘त्याग’ हा शब्दचं नाहीसा झालाय आणि राजकारण्यांकडून याची अपेक्षा ठेवणे म्हणजे वाळवंटात सुई शोधण्यासारखे आहे, पण महाडचे आमदार व शिंदे गटाचे प्रतोद भरतशेठ गोगावले याला अपवाद ठरलेत. मंत्री मंडळ विस्तार होत नाही, पुढे जात आहे आणि नक्की होणार कि नाही असे प्रश्न विरोधक तसेच प्रसारमाध्यमातून होत असताना अखेर मुहूर्त ठरला आणि क्रांति दिनाच्या दिवशी म्हणजे ९ ऑगस्टला शिंदे फडणवीस सरकारचा शपथविधी समारंभ झाला. मुख्यमंत्री हिंगोली – नांदेड दौरा आटपून रात्री उशिरा नंदनवनी पोहोचले आणि खरा दिवस तिकडे सुरु झाला.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मंत्री असलेले व नसलेले आणि काही अपक्ष, आमदार शिंद साहेब नक्की कोणाला संधी देणार याची वाट पाहत होते. अपेक्षा तर सर्वांनाच होती पण हा विस्तार छोटया प्रमाणात ( मिनी ) होणार होता त्यामुळे शिंदे गटातील फक्त ९ जणांचा समावेश यामध्ये करण्यात येणार असल्याची खात्री लायक माहिती होती.  मंत्री पदे सोडून आलेला एकही शिंदे समर्थक आमदार मागे हटण्याच्या तयारीत नव्हता तर अनेक जण आपण कसे योग्य आहोत आणि कसे सर्वात आधी सोबत आलो, निष्ठा – साथ  वगैरे याची पुन्हा आठवण करून देत होते. काही जिल्ह्यातील  एकाहून एक दिग्गज बाशिंग बांधून बसलेले असताना शिंदे साहेबांसोबत सावली सारखे उभे होते ते फक्त भरतशेठ..

भरतशेठ तसे एकनाथरावांचे अगदी सख्खे, दोघांमधील ट्युनिंग सर्वांनी वेळोवेळी पाहिलं आहे. तीन वेळा लोकांमधून निवडून येऊनही ठाकरे सरकारमध्ये डावलला गेलेला रायगडाचा शिलेदार दिलदार मनाचा आणि मैत्रीला जपणारा आपला माणूस म्हणजे भरतशेठ..  ज्या अर्थी शिंदे साहेबांनी भरतशेठला प्रतोद केलं त्याच वेळी अनेक जण अवाक होते, पण जेंव्हा विश्वासू व्यक्ती हवी असते तेव्हा साहजिकच आपल्या प्रामाणिक सहकारी मित्राला शिंदे साहेबांनी जवाबदारी दिली. गोगावले यांना तरी मंडळात स्थान असणारच यात कोणाच्याही मनात शंका नव्हती. जशी घटिका सामीप येत होती तसे नंदनवन वरील तापमान वाढण्यास सुरवात झाली. संधी कोणाला नको ? पहिल्या झटक्यात मिळालं मंत्रिपद तर आणखी काय हवं ? कोर्टाच्या निकालाची तर धास्ती आहेच असे विचार अनेकांच्या मनात चालू असताना, मंत्रिपद सोडून सामील झालेल्या ६ जणांची नावे निश्चित करण्यात आली आणि खरी कसोटी तेथून पुढे चालू झाली. विशेष म्हणजे यामध्ये प्रहार पक्षाचे माजी मंत्री बच्चू कडू यांचे नाव देखील नव्हते यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि काहींचा रक्तदाब कमी अधिक होऊ लागला.

आता ३ जणांना संधी द्यायची होती त्यात आपल्याला संधी मिळणे असणारच याची खात्री आणि विश्वास असताना देखील अनेक सहकारी इच्छुक आमदारांची  अस्वस्थता पाहून आणि त्यामुळे आपल्या नेत्याला, मित्राला शिंदे साहेबांना संकटात सापडलेले फक्त  मित्रानेच ओळखले  आणि एक पाऊल  मागे  घेण्याचा निर्णय घेतला. माझा तुमच्यावर विश्वास आहेच, पण खात्री देखील आहे म्हणत माझं नाव राहू द्या, आपण योग्य त्याला साधी द्या म्हणत भरतशेठ यांनी आपल्या त्यागाचा आणि मित्रत्वाचा पुन्हा परिचय दिला. शिंदे साहेबांना देखील काय बोलले समजेना कदाचित त्यांना हि कुठला पर्याय उरला नव्हता पण मित्राने दाखविलेले औदार्य पाहून त्यांना नक्कीच कर्णाची आठवण झाली असेल यात शंका नाही.

मुंबई – सुरत – गुवाहाटी – गोवा – मुंबई प्रवासात सर्वांना सोबत घेऊन जाणारा,  खऱ्या अर्थाने पात्रता असलेला, आपला सहकारी आमदार इतर सहकारी ऐकण्याच्या मनःस्थितीत नसताना एक पाऊल मागे घेत संधी सोडतो आणि हसत मुखाने पुन्हा शपथ विधी सोहळ्याकडे प्रस्थान करतो हा क्षण बरेच काही सांगून गेला. आजचे राजकारण पाहता असे निर्णय म्हणजे राजकीय आत्महत्या देखील ठरू शकते हे माहित असताना देखील शिंदे साहेबांवरील आणि त्यांच्यातील मित्रावरील विश्वास हेच मनात ठेवत भरतशेठ पुढे चालत आहेत. त्यांना  लोक आपुलकीने शेठ का म्हणतात ते पुन्हा अधोरेखित झालं आणि त्यांनी यावेळीही नेहमी प्रमाणे मन जिंकलं. म्हणूनच म्हणावं वाटतं “ऐसी मैत्री आणि मित्र होणे नाही..”

Bharat Maruti GogawaleBharatshet Gogawale - WikipediaBharatshet Maruti GogawaleBharatsheth GogawleBJPEknath ShindeEknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde)Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) · TwitterEknath shinde NewsGogawale Bharat Maruti(SHS) - MAHAD(RAIGADmarathi newsMumbai - Surat - Guwahati - Goa - MumbaiNo such friendship and friendship..! Dildar Mitra MLA Bharatsheth GogawleShivsenaSS MLA from Mahad
You might also like More from author
पुणे

आज गिरीश बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं – चंद्रकांत पाटील

पुणे

कसब्याचा पराभव हा पराभव नाही… आम्ही कसबा पुन्हा जिंकणारच – चंद्रकांत…

मुंबई

परदेशात जाऊन आपल्या देशाची निंदा करता, यापेक्षा मोठं यादेशाचं दुसरं दुर्दैव काय…

महाराष्ट्र

शिवसेना ही भाजपसोबत होती म्हणून महाराष्ट्रात भाजपला यश मिळू शकले, भाजपची खरी ताकद फार…

महाराष्ट्र

सदू आणि मधू भेटले…. मग मी काय बोलणार?, राज ठाकरे – एकनाथ शिंदे भेटीवर…

राजकीय

एकनाथ शिंदेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा आणि त्याचे पाच…

राजकीय

स्वतःच्याच कर्माने पायावर धोंडा मारून घेतलेले मोदी सरकारच्या नावाने आणि भाजपच्या…

महाराष्ट्र

ओबीसींचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांचा निषेध, भाजपा राज्यभर आंदोलन करणार –…

महाराष्ट्र

संजय राऊतांना शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून हटवण्यात आले.. गजानन किर्तीकर यांची या…

महाराष्ट्र

माहीमच्या समुद्रातील ‘तो’ व्हिडीओ दाखवून… हे तोडलं गेलं नाही तर त्याच्या…

महाराष्ट्र

दादा भुसे यांनी दिलगिरी व्यक्त करावी, सभागृहात शरद पवारांच्या उल्लेखावरून अजित पवार…

महाराष्ट्र

४८ जागा लढवायला आम्ही मूर्ख आहोत का?,संजय शिरसाट यांचा बावनकुळेंना संतप्त सवाल

महाराष्ट्र

एकनाथ शिंदे सोडून शिवसेनेत पुन्हा सगळे येतील – संजय राऊत

महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी सरकारने तत्परतेने काम केले आहे आणि पुढेही करत राहतील – चंद्रकांत…

महाराष्ट्र

राजन साळवी यांच्या कुटुंबालाही एसीबीकडून नोटीस… 20 मार्च रोजी होणार चौकशी

महाराष्ट्र

मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विधानसभेतील अनुपस्थितीबद्दल उपस्थित केलेल्या मुद्द्यावर…

Prev Next

Recent Posts

स्वतःच्या मतावर ठाम असणे आणि नम्र असणे हे बापट साहेबांकडून…

Mar 29, 2023

आज गिरीश बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं –…

Mar 29, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या…

Mar 29, 2023

भाजपा – शिवसेनेतर्फे ३० मार्चपासून सावरकर गौरव यात्रा,…

Mar 29, 2023

ग्रामीण भागाच्या विकासासोबत इथली संस्कृती टिकणेही आवश्यक…

Mar 29, 2023

पुणे जिल्ह्यात महिला व बालविकास भवन उभारण्यासाठी आराखडा तयार…

Mar 28, 2023

कसब्याचा पराभव हा पराभव नाही… आम्ही कसबा पुन्हा…

Mar 28, 2023

गिरीश खत्री मित्र परिवार आयोजित “स्वच्छतेचा नमो…

Mar 28, 2023

पुणे शहरातील मेट्रो, जायका, पाणी पुरवठा, यासारख्या…

Mar 27, 2023
Prev Next 1 of 219
More Stories

आज गिरीश बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं –…

Mar 29, 2023

कसब्याचा पराभव हा पराभव नाही… आम्ही कसबा पुन्हा…

Mar 28, 2023

परदेशात जाऊन आपल्या देशाची निंदा करता, यापेक्षा मोठं…

Mar 27, 2023

शिवसेना ही भाजपसोबत होती म्हणून महाराष्ट्रात भाजपला यश मिळू…

Mar 27, 2023

सदू आणि मधू भेटले…. मग मी काय बोलणार?, राज ठाकरे…

Mar 27, 2023

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर