कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय

कोकण शिक्षक मतदारसंघाचा निकाल नुकताच समोर आला आहे. येथे भाजपाला यश मिळाले आहे. राज्यातील पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे.  भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शेकापच्या बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना २० हजारपेक्षा जास्त मत पडली असून शेकापच्या बाळाराम पाटील यांना केवळ ९ हजार ५०० मत पडली आहेत. म्हात्रे यांच्या विजयाने महाविकास  धक्का मिळाला आहे.

म्हात्रे यांनी आपल्या विजयानंतर प्रतिक्रिया देताना म्हटले कि, हा विजय माझा एकट्याचा नसून मतदारसंघातील संपूर्ण शिक्षकांचा आहे. गेल्या सहा वर्षात मी जे काम केलं त्याची पोचपावती आज कोकण विभागातील शिक्षकांनी दिली आहे. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी माझ्यावर विश्वास टाकला तो आ सार्थकी लागला असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले.
ठाकरे गटाची संघटना असलेल्या शिक्षक सेनेने दिलेल्या पाठिंब्याबाबत त्यांनी म्हटले कि, या निवडणुकीत भाजप , बाळासाहेबांची शिवसेना आणीन आरपीआय गट या तिघांचा मी उमेदवार आहे. शिक्षक सेना आम्हीच तयार केली होती. मी ठाकरे गटाकडे  उमेदवारी मागितली होती. पण त्यांनी महाविकास आघाडी म्हणून बाळासाहेब पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर भाजपने सहकार्य केले आणि मी उमेदवारी स्वीकारली, असे म्हात्रे यांनी म्हटले.