आज आमच्याकडेसुद्धा पायताण आहेत हे विसरून चालणार नाही, बाळासाहेब थोरातांचे सरकारवर टीकास्त्र

24

केंद्र सरकारच्या निषेधार्थ आज विरोधकांनी तोंडाला कळ्या पट्ट्या लावून आज विधान भवनाच्या परिसरात अंदोलन केले. विरोधकांची मुस्कटदाबी होतेय, देशात हुकूमशाही असल्याचा  आरोप विरोधकांनी केला आहे.  आज विधानसभेत विरोधकांनी सभात्याग केला. सभात्याग केल्यानंतर विधानभवन परिसरातून संयुक्त पत्रकार परिषद घेतली असून, सरकारला खडे बोल सुनावले  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकरवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले कि आज आमचे राष्ट्रीय नेते आहेत, उद्या त्यांच्याकडेही राष्ट्रीय नेते आहेत. आज आमच्याकडेसुद्धा पायताण आहेत हे विसरून चालणार नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करता अध्यक्षांनी कडक अशी कारवाई करावी असा आग्रह आम्ही धरलेला होता, असे थोरात यांनी म्हटले.

थोरात पुढे म्हणाले कि, आमच्या काही सदस्यांकडून चुकलं असेल तर त्यांच्यावरही कारवाई करा, परंतु हि जी नवी पद्धत पडत आहे, त्यामुळे कोणत्याही पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या बाबतीत अशा पद्धतीने पुढेही घडण्याची शक्यता आहे. म्हणून आपण हे कुठे तरी बंद केलं पाहिजे.  हे कृत्य ज्यांनी केलं, त्यांना शिक्षा केली पाहिजे, असा आग्रह आम्ही धरलेला होता. हि जबाबदारी अध्यक्षांची आहे, त्यांनी निरपेक्ष राहिले पाहिजे आणि निरपेक्ष राहून  निर्णय दिले पाहिजेत.

मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी दोन दिवसांचं अधिवेशन बोलवावं अशी अशोक चव्हाणांची जी सूचना आहे, ती सरकारनं मान्य करायला हवी. सरकारची नकारात्मक भूमिका हि आपल्या परंपरेला राजेशी नाही. म्हणून आम्ही सभात्याग केलेला असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.

थोरात यांनी पुढे म्हटले कि, विधानसभेच्या अधिवेशनात पायऱ्यांवर बसून जनतेच्या ज्या मागण्या आहेत, ज्यांचे जे प्रश्न आहेत ते मांडण्याची एक पद्धत आहे, एक आंदोलन आपण करत असतो आणि ती सर्व वर्षानुवर्षे चाललेली गोष्ट आहे. दुर्दैवाने दोन दिवसांपूर्वी जे घडलं, ते आपल्या विधानसभेच्या इतिहासात दुर्दैवी अशी गोष्ट आहे, असे मत थोरात यांनी व्यक्त केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.