नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सत्यजित तांबे विजयी… येत्या ४ तारखेला मी माझी भूमिका स्पष्ट करेन, सत्यजित तांबेंचे सूतोवाच

नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. नाशिक मतदारसंघावर सगळ्यांचेच लक्ष लागले होते. या निवडणुकीत उमेदवारीवरून सत्यजित तांबे काँग्रेसमध्ये मतभेद झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या मतभेदावरून महाविकास आघडीने शुभांगी पाटील यांना उमेदवारी दिली होती. तिन्ही पक्षांचा पाठिंबा असताना देखील सत्यजित तांबे विजयी ठरले आहेत. शुभांगी पाटलांचा पराभव झाला आहे.

सत्यजित तांबे यांनी या विजयानंतर प्रतिक्रिया दिली कि, मतांची टक्केवारी कमी झाली . सोमवारचा दिवस होता, वर्किंग डे होता. अनेक लोक मतदानासाठी येऊ शकले नाहीत. त्यामुळे अपेक्षेपेक्षा कमी मत आहेत. मिळालेल्या यशामुळे आम्ही समाधानी आहोत. आमच्या परिवाराने कायम राजकारण निवडणुकीपुरत केलं आहे. निवडणुकीनंतर आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचं काम केलं आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षाचे लोक आम्हाला मदत करत असतात, असे सत्यजित यांनी म्हटले.  येत्या ४ तारखेला मी माझी भूमिका स्पष्ट करेन असे सूतोवाच तांबे यांनी केले.

सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर त्यांचे वडील सुधीर तांबे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले कि, मी तेरा वर्ष या मतदारसंघातून निवडून गेलो आहे. येथील लोकांनी खूप प्रेम दिल आहे. आमच्या परिवारावर सत्यजितवर विश्वास दाखवला आहे. जन्नतेचे प्रश्न सोडवणे हे सत्यजितचे उद्दिष्ट असले पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.