टेक्निकल टेक्सटाईलमध्ये आपण चीनला लवकरच मागे टाकू – चंद्रकांत पाटील

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टेक्सटाईल्स इंडस्ट्रीचे महत्व एका कार्यक्रमात पटवून दिले. त्यांनी यावेळी म्हटले कि, वस्त्रोद्योग देशाला खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार पुरवतो. आज टेक्निकल टेक्स्टाइल ही संकल्पना गाजते आहे. आपला देश टेक्स्टाईल्सचा जगात क्रमांक २ चा निर्यातदार आहे. पण लवकरच क्रमांक १ च्या चीनला मागे टाकून आपण क्रमांक १ बनू, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, विणकर,हातमागावर काम करणारे अशांची कला लुप्त होत चालली आहे, कारण ते परवडत नाही. माझ्याकडे टेक्स्टाईल डिपार्टमेंट आहे. यापूर्वीही माझ्याकडे टेक्स्टाईल डिपार्टमेंट होते . त्यावेळी हा उद्योग वाचवण्यासाठी आम्ही खूप गोष्टी केल्या असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. विणकर, हातमागावर काम करणारे हे काम ऐतिहासिक आहे , जुनं आहे. एकूणच टेक्स्टाईल इंडस्ट्री हि देशाला खूप मोठा रोजगार देईल असे त्यांनी म्हटले.
आता टेक्निकल टेक्स्टाईल हा शब्द जर आपणं पहिला तर हे कापड आहे त्यावर प्रोसेस केल्यावर त्याचा गालिचा झाला, याला टेक्निकल टेक्स्टाईल म्हणातात . यात आपण एक्स्पोर्ट मध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहोत. आणि चायनाला देखील मागे टाकू असं दिसतंय कारण मुंबई आपण बैठक केली . हि इंडस्ट्री रोजगार देणारी आहे. परकीय चलन निर्माण करणारी आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.