अजित पवार यांचे पुण्यात येऊन बारा वाजवीन, माझ्या नादाला लागू नका – नारायण राणे

9

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे  यांच्यावर एक टिप्पणी करत टीका केली होती. यावर आज नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार यांचे पुण्यात येऊन बारा वाजवीन, माझ्या नादाला लागू नका, अशा शब्दात नारायण राणे यांनी अजित पवार यांना थेट इशाराच दिला आहे.

नारायण राणे यांनी आज कोल्हापूर दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. अजित पवार यांना बारामतीच्या बाहेर  कितपत राजकारणं कळतं मला माहित नाही. ज्या प्रकारचा राजकारणी आहे त्याबद्दल बोलू नये. मी सलग सहावेळा निवडून आलो आहे. महिला असेल, पुरुष असेल, उमेदवार हा उमेदवार असतो.

औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतरावरून त्यांनी म्हटले कि, सगळेच श्रेय घ्यायला येतील. मी केलं, मी केलं, काय केलं तू ? मराठी भाषेतील विशेषण कुठेही वापरतो. कोणता पक्ष संपवायला मी काही ज्योतिषी नाही, जे लोक काम करतात त्यांचा पक्ष टिकतो, बाकीचे संपून जातात.

यावेळी राणे यांनी उद्धव ठाकरे यांना देखील टार्गेट केले. उद्धव ठाकरे यांच्याकडे काय राहील आहे? कुठलाही अस्तित्व नाही, काही नाही. गेलेले लोक काय म्हणतात आपल्याबद्दल त पहा. अडिच वर्षत आपणं काय केले ते पहा.

अजित पवार नेमक काय म्हणाले ?

चिंचवडमध्ये अजित पवार म्हणाले कि, शिवसेना फोडणारे आणि शिवसेनेला सोडून गेलेले कसे पराभूत झाले हे सांगताना त्यांनी म्हटले कि, राणेंना वांद्रेत बाईन पाडलं. शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी राणेंचा पराभव केला होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.