एका महिला आमदाराच्या छोट्या बाळासाठी कोणती व्यवस्था झालेली नाही याचं दुःख होत आहे, हिरकणी कक्षावरून सरोज अहिरेंची नाराजी

5
मुंबईत आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँगेसच्या आमदार सरोज अहिरे या आपल्या बाळाला घेऊन विधिमंडळात दाखल झाल्या. परंतु विधिमंडळात बाळाला ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या हिरकणी कक्षात सोयी सुविधा नसल्याने सरोज यांनी नाराजी व्यक्त केली.
सरोज यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले कि, माझ्या देवळाली मतदार संघासाठी न्याय मागण्यासाठी मी आज इथे माझा बाळाला घेऊन आले आहे. मागच्या आठवड्यामध्ये २३ फेब्रुवारी २०२३ ला मी प्रधान सचिवांना पत्र लिहून हिरकणी कक्षाची मागणी केली होती, त्यांनी एक कार्यालय दिले आहे मात्र हिरकणी कक्षामध्ये प्रचंड धूळ आहे, बसण्याची व बाळाला झोपवण्यासाठी व्यवस्था नाही, त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची हिरकणी कक्ष म्हणून व्यवस्था केली गेली नाही, अशी नाराजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार सरोज अहिरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
नागपूर अधिवेशनच्या वेळेस सर्व गोष्टीचे पालन केले होत आणि पुढच्या अधिवेशनाला मुंबईला कायमस्वरूपी हिरकणी कक्ष करण्यात येईल जेणेकरून आपल्या मतदार संघासाठी काम करण्याऱ्या आपल्या महिला आमदारांना सहकार्य होईल. परंतु आज कुठलीच व्यवस्था त्या ठिकाणी झालेली नाही .विधिमंडळाचे कोटी रुपयाचं टेंडर निघाले आहे तिथे काम चालू आहे पण एक महिला आमदाराचा छोट्या बाळासाठी कोणती व्यवस्था झालेली नाही याच दुःख होत आहे, अशा भावना सरोज अहिरे यांनी व्यक्त करत जर आज व्यवस्था झाली नाही तर मला हे अधिवेशन सोडून जावे लागेल, असेही त्या म्हणाल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.