राजकारणात शिवसेनेला स्क्रिप्टेड काही करण्याची गरज नाही, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दसरा मेळाव्यादिवशी केलेल्या भाषणावरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. या सभेतील भाषणात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना लक्ष केल्याचे पाहायला मिळाले. यावरून आज संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले राज यांची सभा स्क्रिप्टेड होती. आम्हाला बाहेरून सलीम जावेद लागत नाहीत असा टोलाही राऊत यांनी लगावला.
नाशिक येथे माध्यमांशी बोलताना राऊत यांनी म्हटले कि, विधिमंडळाबाहेरची उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातली भेट स्क्रिप्टेड होती असा आरोप मनसेने केला आहे. त्यावर राऊत यांनी म्हटले कि, जस कि, त्यांच्या नेत्यांचं परवाच भाषण स्क्रिप्टेड होतं. मी सर्वत्र तेच ऐकतोय आणि वाचतोय.
राजकारणात शिवसेनेला स्क्रिप्टेड काही करण्याची गरज नाही. आम्हाला बाहेरून सलीम – जावेद लागत नाहीत. आम्ही समर्थ आहोत. आम्ही स्वतंत्र बुद्धीने काम करतो, विचार करतो. आमचा पक्ष स्वतःच्या पायावर उभा आहे. दुसऱ्यांची डोकी आम्हाला कामासाठी लागत नाहीत. ज्या प्रमाणे उद्धव ठाकरे आणि त्याच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला लोकांचा पाठिंबा मिळतोय त्यामुळे भाजप आणि त्यांचे बगलबच्चे हे हादरलेत. आणि आमच्याशी सामना करण्यासाठी मग काय करणार तर जातीय तेढ निर्माण करायची. दंगली घडवायच्या. भीतीच वातावरण निर्माण करून निवडणुकींना समोर जायचं असं कारस्थान दिसत आहे असे राऊत यांनी म्हटले.