त्यांच्या वाट्याला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १७ वा वर्धापन दिन बुधवारी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून राजकीय टोलेबाजी केली. यावेळी ठाकरे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. भोंग्याच्या प्रकरणात महाराष्ट्रभर १७ हजार केसेस दाखल झाल्या. मी म्हणालो ना, वाट्याला जायचं नाही. मुख्यमंत्रीपदावरून जावं लागल , असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. राज ठाकरेंच्या भाषणावरून खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देत प्रत्युत्तर दिले.
संजय राऊत यांनी म्हटले कि, कुण्णी कोणाच्या वाट्याला गेलेलं नाही. त्यांच्या वाट्याला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार किंवा मुख्यमंत्री पद का गेलं हे अख्या जगाला माहिती आहे. त्यांना जर माहिती नसेल तर अजून त्यांच्या पक्षाची वाढ व्यवस्थित होणं गरजेच आहे. महाराष्ट्रातलं सरकार हे फक्त ईडी, सीबीआय या यंत्रणांचा गैरवापर करून पाडण्यात आलं आणि जोडीला खोके, असे राऊत म्हणाले.
राऊत यांनी पुढे म्हटले कि, ईडी काय आहे हे काही मी मनसेप्रमुखांना वेगळं सांगायला नको. त्यांनी त्याचा चांगला अनुभव घेतला आहे. फक्त ईडीचा अनुभव आम्ही घेऊनही आमच्या तोफा आणि कार्य चालू आहे. शिवसेनेने कधीही हिंदुत्व सोडलेलं नाही. कोण काय म्हणत त्यावरून शिवसेनेची भूमिका ठरत नाही. तुम्ही तुमचं काम करा, असे राऊत यांनी म्हटले.
राज ठाकरे काय म्हणाले ?
राज ठाकरे यावेळी म्हणाले कि, पाकिस्तानी कलाकारांना देशाबाहेर काढण्याचं काम मनसेने केलं. बाकीचे हिंदुत्ववादी लोक कुठे होते? काय करत होते ? चिंतन. बाकीचे म्हणतात आम्ही हिंदुत्ववादाला मानतो, म्हंणजे काय करता? तुमचं हिंदुत्व म्हंणजे नेमकं काय असत? नुसती जपमाळ ? प्रत्यक्ष कृतीत तर कधी दिसत नाही ते . भोंग्याच्या प्रकरणानंतर मला अयोध्येला बोलावलं. विरोध करणारे हिंदुत्ववादीच. असे राज ठाकरे यांनी म्हटले. भोंग्याच्या प्रकरणात महाराष्ट्रभर १७ हजार केसेस दाखल झाल्या. मी म्हणालो ना, वाट्याला जायचं नाही. मुख्यमंत्रीपदावरून जावं लागल , असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.