विरोधकांच्या विरोधात केंद्र सरकारने सातत्याने यंत्रणा राबविण्यास सुरवात केली आहे – सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज पुन्हा ईडीकडून झालेल्या छापेमारीवरून खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या आहेत. विरोधकांच्या विरोधात केंद्र सरकारने सातत्याने यंत्रणा राबविण्यास सुरवात केली असल्याचे सुळे यांनी म्हटले. संविधानाच्या बाहेरच्या चौकटीत जाऊन हे सगळं सुरु आहे. हा प्रवास दडपशाहीच्या दिशेने सुरु आहे. अशी शंका मला येऊ लागली आहे. हि शंका शंकेपुरतीच मर्यदित न राहता त्याच दिशेने केंद्र सरकार पावलं उचलत आहेत हे दिसून येत आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
सुप्रिया सुळे यांनी म्हटले कि, हसन मुश्रीफ यांच्यावर दोन महिन्यात तिसऱ्यांदा कारवाई झाली याच काही आश्चर्य वाटत नाही. अनिल देशमुखांच्या प्रकरणात ईडी आणीन सीबीआयने १०९ वेळा छापेमारी केली होती. मुश्रीफ यांच्यावर छापेमारी करून ईडी आणि सीबीआयला हा विक्रम मोडायला असावा हि शक्यता नाकारता येत नाही. मुश्रीफ यांच्या घरी ईडी तिसऱ्यांदा गेली आहे तरीही पहिल्या दोन कारवायांमध्ये काय झालं ? त्याची माहिती मिळत नाही हे दुर्दैव आहे असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
अनिल देशमुख, संजय राऊत, एकनाथ खडसे, नावाब मलिक यांच्यावरही याच पद्धतीने अन्याय झाला आहे. मुश्रीफ यांच्या विरोधात झालेली हि कारवाई आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लक्षात आणून देऊ असे देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटले.