आम्हाला तोंड उघडायला लावू नका… अन्यथा महाराष्ट्रात राजकीय स्फोट होतील – अमृता फडणवीस यांना धमकावल्याप्रकरणी संजय राऊत यांचा इशारा
सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस याना धमकवल्याचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणी अनिक्षा जयसिंघानी हिला अटक करण्यात आली असल्याची माहिती देखील समोर आली आहे. अनिक्षाने १० कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी अन्नही एक गोष्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत अनिक्षा आणि तिच्या वडिलांचा फोटो व्हायरल होत आहे. यावर राजकीय वर्तुळात आणखी चर्चांना उधाण आले आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.