पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेच्या विविध विषयाच्या कामकाजाचा घेतला आढावा

अमरावती : अमरावती महापालिकेच्या कामकाजाचा शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेतला. पाटील यांनी प्रथम पालिकेच्या कार्यालयाला भेट दिली. त्यांनतर पाटील यांनी कामकाजाची माहिती घेतली. घनकचरा व्यवस्थापन, नियमित पाणीपुरवठा याची योग्य अंमलबजावणी करावी तसेच भुयारी गटार योजनेसंदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करावा. याबाबत नियमितपणे आढावा घेण्यात येईल, असे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी यावेळी दिले.