राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणार

5
मुंबई : आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गुरुवार दि. ७ डिसेंबर २०२३ पासून सुरू होणार असून; अधिवेशनाच्या कामकाजाबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, हिवाळी अधिवेशन गुरुवार दि ७ डिसेंबर २०२३ ते बुधवार दि.२० डिसेंबर २०२३ या कालावधीतघेण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशनाचे एकूण दिवस १४ असून, यामध्ये प्रत्यक्ष कामकाज १० दिवस, तर सुट्या (शनिवार व रविवार मिळून) ४ दिवस आहेत.

या बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, मंत्री, दोन्ही सभागृहाचे सदस्य,विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे संबंधित मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.