जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ ची प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता आदी कार्यवाही तात्काळ पूर्ण करून विकासकामांना चालना द्यावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

21
अमरावती : अमरावती जिल्हा वार्षिक योजनेतील सन २०२३-२४ व सन २०२४-२५ च्या प्रारूप आराखड्याचा आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी अमरावती येथील नियोजन भवनात घेतला. यात अमरावती जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ ची प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता आदी कार्यवाही तात्काळ पूर्ण करून विकासकामांना चालना द्यावी. विहित मुदतीत ही कामे पूर्ण करावी. तसेच, यंत्रणांनी तात्काळ प्रस्ताव सादर करावे, असे निर्देश पाटील यांनी दिले.
या बैठकीत सन २०२३-२४ व सन २०२४-२५ जिल्हा वार्षिक योजनेचा प्रारुप आराखडा पीपीटीद्वारे सादरीकरण करण्यात आले. सन २०२४-२५ च्या प्रारूप आराखड्यात विविध यंत्रणांकडून सर्वसाधारण योजनेत १ हजार १७० कोटींची मागणी करण्यात आली आहे. तथापि, महत्त्वाच्या कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पाटील यांनी याप्रसंगी दिली. बैठकीत सन २०२३- २४ च्या खर्चास मंजूरी व सन २०२४-२५ जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. जिल्ह्यासाठी ३७१ कोटीच्या प्रारूप आराखड्याला यावेळी मंजुरी देण्यात आली.
बैठकीस व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, आमदार बळवंत वानखडे, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय, जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच विविध विभागप्रमुख आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.