मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश… पिरंगुटमधील सर्व उद्योगांना नियमित वीजपुरवठा होण्याचा मार्ग झाला मोकळा

5
पुणे : काही वर्षांपासून पिरंगुट येथील उद्योग व कारखान्यांना अनियमित वीज पुरवठा होत होता. ही समस्या दूर करण्याची मागणी तेथील उद्योजकांकडून सातत्याने होत होती. यासाठी भाजपा पायाभूत सुविधा आघाडीचे मंदार देवगावकर यांनी शिष्टमंडळासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन सादर करुन ही समस्या अधोरेखित केली होती. चंद्रकांत पाटील यांनी याचा पाठपुरावा करत  आमदार विकास निधीतून या कामासाठी त्वरित निधी उपलब्ध करून दिला.
चंद्रकांत पाटील याची माहिती दिली कि, पिरंगुट औद्योगिक परिसरात स्वतंत्र फीडर गरजेचा असून, त्यासाठी निधी आवश्यक असल्याची माहिती महावितरणकडून मिळाली. त्यामुळे उद्योजकांची मागणी लक्षात घेऊन पाटील यांनी आमदार विकास निधीतून या कामासाठी त्वरित निधी उपलब्ध करून दिला होता. त्यातूनच आता वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक असणारी कामे लवकरच पूर्ण होतील. पिरंगुटमधील सर्व उद्योगांना नियमित वीजपुरवठा होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. विशेष आनंदाची बाब म्हणजे पिरंगुटमधील ३०० हून अधिक सूक्ष्म व लघुउद्योगांना याचा लाभ होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.