डॉ. बाबासाहेबांचे विचार हीच समाजपरिवर्तनाची ऊर्जा; पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भीम अनुयायांची भेट घेऊन जयंतीच्या दिल्या शुभेच्छा

7

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या वतीने आयोजित विशेष अभिवादन सोहळ्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून महामानवाच्या स्मृतींना पुष्पहार अर्पण केला. यावेळी त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भीम अनुयायांची भेट घेऊन त्यांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, डॉ. बाबासाहेबांचे विचार हे केवळ शब्द नसून ती समाजपरिवर्तनाची ऊर्जा आहे. महामानवाच्या या विचारांमुळेच आज देशाला एक भक्कम संविधान आणि समतेची दिशा मिळाली आहे. या सोहळ्याचे आयोजन अत्यंत प्रेरणादायी पद्धतीने करण्यात आले होते.

या सोहळ्यास उपमहापौर परशुराम वाडेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू पराग काळकर, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.