डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एरंडवणेत मोफत आरोग्य शिबीर; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : कोथरूडमधील एरंडवणे भागात, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक २९ च्या अध्यक्षा ॲड. प्राचीताई बगाटे यांच्या संकल्पनेतून ‘मोफत नेत्र आणि दंत तपासणी शिबिरा’चे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला आणि जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. बाबासाहेबांचा ‘शिक्षण आणि आरोग्य’ यांवरील विचार केंद्रस्थानी ठेवून राबवलेला हा उपक्रम खरोखर कौतुकास्पद असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. या शिबिरात एरंडवणे भागातील शेकडो नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली.
या कार्यक्रमास अध्यक्ष गिरीश खत्री, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माजी नगरसेवक जयंत भावे, भाजपा नेते अमोल डांगे, बाळासाहेब धनवे, विठ्ठल मानकर, वैभव जमदाडे, सुयश गोडबोले, संगीता अधवडे, अभिजीत मारणे, रमा डांगे, अनघा जगताप, मंगल शिंदे, संगीता शेवडे व इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.