पुणे : आता पुणे शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी परिस्थितीची माहिती घेत नागरिकांना आवाहन केले आहे आहे. पाटील स्वतः महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, आवश्यक तिथे मदत कार्य पोहोचविण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
पाटील याची माहिती दिली कि, बाणेर, पाषाण, बालेवाडी याभागात पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. काही ठिकाणी झाडे पडली आहेत. महानगरपालिकेची सगळी यंत्रणा, सर्व क्षेत्रीय कार्यालय, आवश्यक तेथे पोलीस कर्मचारी यासगळ्या परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे कि, या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रशासन आपल्या परीने सगळी मदत करत आहे. जी काही नुकसान भरपाई होईल ती शासनाकडून दिली जाईल. आपण पुढे दिलेल्या हेल्पलाईन नंबर वर फोन करून परिस्थिती कळवावी. प्रशासनाची टीम तेथे नक्कीच सहकार्य करण्यास येईल.
नागरिकांनीही सतर्क रहावे आणि मदत कार्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा :-
आपत्कालीन संपर्क: ०२०-२५५०६८००
अग्रिशमन दल : १०१
रुग्णवाहिका : १०२
पोलीस : १००
रक्तपेढी : १९१०
Get real time updates directly on you device, subscribe now.