राज्यभरात देवस्थानांच्या जमिनी बळकावण्याचा उद्योग भाजपकडून सुरू – नवाब मलिक

4

मुंबई: टराज्यभरात देवस्थानांच्या जमिनी बळकवण्याचा उद्योग भाजपकडून सुरू आहे. प्रभू श्रीरामाच्या नावाने भाजप राजकारण करत असते, त्याच भाजपातील नेते राम देवस्थानाची, विठोबा देवस्थानाची जागा हटपतायत,’ असा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला. मुस्लीम वक्फ बोर्डाच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेल्या तक्रारींवर पत्रकार परिषद घेत असताना नवाब मलिक यांनी भाजपवर खळबळजनक आरोप केले.

नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, वक्फ बोर्डाच्यावतीने पुण्यातील एक ट्रस्ट एंडोवमेंट ताबूत ट्रस्ट प्रकरणात जे एफआयआर दाखल करण्यात आले होते. त्याप्रकरणी ईडीची चौकशी सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये बोर्डाकडून ११ एफआयआर दाखल केले आहेत. यामधील पहिला एफआयआर नांदेड, औरंगाबाद, बुराहण शाह वली परभणी, जालना, पुणे, बदलापूर आणि आष्टी, बीड या दोन ठिकाणी दोन गुन्हे दाखल केले आहेत.

नवाब मलिक म्हणाले की, ‘गेल्या काही दिवसांपासून ईडीने वक्फ बोर्डात छापे टाकल्याच्या बातम्या येत होत्या. पण आम्ही स्पष्ट केले होते असे काही नव्हते. बीडमध्ये सर्व्हिस इनाम जमीन ३ ठिकाणी होती. पण मदत इनाम जाहीर करून त्यावर खासगी नाव चढवून प्लॉटिंग करण्यात आले आणि त्याची विक्री केली जात आहे.

दरम्यान राज्यातील १० ठिकाणी देवस्थानांच्या जमिनीत केलेले भ्रष्टाचार राम खाडे यांनी समोर आणले आहेत. यामधील हिंदू देवस्थान ७ आणि ३ मुस्लिम देवस्थान आहेत. यात विठोबा देवस्थान ३१ एकर ४२ गुंठे, खंडोबा देवस्थान ३५ एकर, राम देवस्थान ६५ एकर, खंडोबा देवस्थान बेळगाव ६५ एकर अशा अनेक ठिकाणांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांच्या मदतीने एकूण ५१३ एकल जमीन ताब्यात घेतली आहे. यात उपजिल्हाधिरी शेळके यांची मदत घेतली होती. पण याप्रकरणी त्याचे निलंबन करण्यात आले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.