आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मागणीला यश, सावित्री नदी पात्रातील गाळ उपस्याकरीता आणखी २० कोटीच्या निधीला मुख्यमंत्र्यांची मंजुरी
रायगड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वा खाली मुंबई गोवा महामार्गा संदर्भात महत्वपूर्ण बैठक काळ २५ जुलै रोजी मुंबई येथे पार पडली. या बैठकी दरम्यान महाड पोलादपूर माणगांव या मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी महाड शहरासह रायगड जिल्ह्यात आलेल्या पूराचा संदर्भ देत महाड शहराच्या बाजुने जाणाऱ्या सावित्री नदी पात्रातील गाळ काढण्यासाठी २० कोटीच्या निधीची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांचे कडे केली. या मागणीची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावित्री नदीतील गाळ काढण्यासाठी २० कोटीचा निधी मंजुर केला आहे.
जुलै २०२१ च्या महा प्रलयानंतर सलग दोन वर्षे महाड तालुकयातील सावित्री नदीसह काळ व उपनद्यांमधील गाळ काढल्यामुळे गेल्या २ वर्षात महाड शहरासह तालुक्यात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरले यावर्षीही महाडकरांना याचा अनुभव दोन वेळा पहायला मिळाला असल्याचे आपण “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे” यांच्या निदर्शनास आणून देत आणखी एक दोन वर्षे हा गाळ उपसा सुरु ठेवला तर महाड शहरासह संपूर्ण तालुक्याला महापूरापासून मुक्ती मिळेल आणि करोडो रुपयांचे नुकसान टाळता येईल त्यामुळे सावित्री नदीतील गाळ उपसा करण्यासाठी २० कोटीच्या निधीची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांचे कडे केली असल्याचे गोगावले यांनी सांगितले.
काल मुंबई येथील बैठकीला जाण्या पुर्वी सकाळी महाड शहरातील पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर महाड शहरासह तालुक्याला पुराच्या संकटातून मुक्त करण्यासाठी आपण आणि शासन कटिबध्द असल्याची ग्वाही महाडकरांना दिली होत असे गोगावले म्हणाले. अवघ्या काही तासातच त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सावित्री नदीतील गाळ काढण्यासाठी २० कोटीच्या निधीची मागणी केली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने गाळ काढण्यासाठी २० कोटीचा निधी मंजूर केला याकरिता संपूर्ण महाडकरांकडून त्यांनी मुखमंत्री एकनाथ शिंदे व आमदार भरतशेठ गोगावले यांचे आभार मानले जात आहेत