येणाऱ्या निवडणुकीत आम्ही दूध का दूध आणि पानी का पानी दाखवून देऊ – आमदार भरतशेठ गोगावले
महाड : संविधान जागर समिती आयोजित संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त संविधान जागर यात्रा २०२४ चे आयोजन महाड चवदार तळे येथे करण्यात आले होते. यावेळी महाड विधानसभेचे आमदार, तथा संविधान सभेचे अध्यक्ष भरतशेठ गोगावले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी चवदार तळ्याविषयी, त्याच्या सोशोभीकरणाविषयी महायुती सरकारकडून करण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही दूध का दूध आणि पानी का पानी दाखवून असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पाण्यातून मासा काढल्यावर जसा तडफडतो तशी काँग्रेसवाल्यांची अवस्था झालेली असल्याचे गोगावले म्हणाले.
यावेळी मंचावर भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि संविधान जागर समितीचे संयोजक सदस्य ॲड. धर्मपाल मेश्राम , संविधान जागर समितीचे संयोजक जेष्ठ मानव अधिकार कार्यकर्ता, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्रचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. वाल्मीक (तात्या) निकाळजे, कर्मवीर दादासाहेव गायकवाड यांचे नातू, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, जयभीम आर्मीचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष नितीन मोरे, सामाजिक कार्यकर्ते निलेश गद्रे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी, माजी खासदार बाळासाहेब साळुंके यांचे सुपूत्र काश्यप साळुंके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या माजी सदस्या योजनाताई ठोकळे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या मुंबई प्रदेश उपाध्यक्ष तथा घे भरारी महिला बचत गटाच्या अध्यक्ष स्नेहाताई भालेराव, जयभीम सेनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष संजय कांबळे, ऐतिहासिक धम्मभूमी ट्रस्ट देहुरोड तथा भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव राजू माने, फुले, शाहू, आंबेडकरी कार्यकर्ता आकाश अंभोरे, भारतीय सम्यक क्रांती लोककला प्रबोधिनीचे प्रदेश संघटक डॉ. विजय मोरे, बौद्ध युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय गव्हाळे, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव नागसेन पुंडके, ऍड राहूल झांबरे, संघपाल मेश्राम, डॉ आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त प्रकाश कांबळे , डॉ आंबेडकर फाउंडेशन च्या सदस्या योजना ठोकळे, आदी उपस्थित होते.