चंद्रकांत पाटील अमरावती दौऱ्यावर असताना चिखलदारा तालुक्यातील मनभंग मधील एका बहिणीने राखी बांधून केले प्रेम व्यक्त
अमरावती : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या अमरावती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. या भेटीदरम्यान चिखलदारा तालुक्यातील मनभंग मधील एका बहिणीने राखी बांधून आपले प्रेम व्यक्त केले. तसेच चिखलदारा तालुक्यातील मनभंग गावातील अनिता दहिकर या भगिनीच्या बँक खात्यात ३ हजार रुपये जमा झाल्याबद्दल पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.
चंद्रकांत पाटील अमरावती दौऱ्यावर असताना चिखलदारा तालुक्यातील मनभंग मधील एका बहिणीने राखी बांधून आपले प्रेम व्यक्त केले. राखी जवळ नसताना या बहिणीने साधा धागा राखी म्हणून माझ्या मनगटावर बांधला, ही बाब मनाला अक्षरशः भावली असल्याचे पाटील म्हणाले. तीच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा हा धागा माझ्यासाठी अत्यंत अमूल्य आहे. शिवाय महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणीच्या उन्नतीसाठी आपल्यावर असलेल्या जबाबदारीचे हे प्रतीक आहे. या बहिणीने दर्शविलेल्या या प्रेमाबद्दल पाटील यांनी तिचे मनापासून आभारी मानले.
राज्यातील माता भगिनिंच्या बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याच धरतीवर अमरावती जिल्ह्यातील चिखलदारा तालुक्यातील मनभंग गावातील अनिता दहिकर या भगिनीच्या बँक खात्यात ३ हजार रुपये जमा झाल्याबद्दल पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. या निमित्ताने महायुती सरकार हे राज्यातील माता भगिनिंना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारे, वचनपूर्ती करणारे सरकार असल्याचे अधोरेखित केले, असे पाटील म्हणाले.