आकले येथील बुरुड समाज्याच्या नवीन सभागृहाच्या कामाचा शुभारंभ; विकास गोगावले यांच्या हस्ते कोनशीला पूजन
नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी गोगावले परिवार सदैव तत्पर - विकास गोगावले
महाड : सक्षम समाज निर्माण होण्याकरीता युवा वर्ग जितका महत्वाचा असतो तसेच त्या समाजातील जेष्ठांचे मार्गदर्शन आणि सहभाग देखील मोलाचा ठरतो. आज महाड तालुक्यातील आकले गावातील सर्व युवकांनी एकत्रीत येऊन ऐक नवा आदर्श घडून आणत गावातील जेष्ठ लोकांच्या मार्गदर्शनाखाली तेथे श्री. विकासशेठ गोगावले मित्र मंडळाची स्थापना करण्यात आली. यावेळी नामफलकाचे हि अनावरण युवासेना कोअर कमिटी सदस्य विकास भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच याचे प्रमुख उद्दिष्ट असणार असल्याचे सांगत नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी गोगावले परिवार सदैव तत्पर असल्याचे विकास गोगावले यांनी सांगितले.
तसेच यावेळी बुरुड समाज्याच्या नवीन सभागृहाच्या कामाचा शुभारंभ विकास गोगावले यांच्या हस्ते कोनशीला पूजन करून करण्यात आला.आकले येथील युवा वर्ग, ग्रामस्थ व बुरुड समाज्याच्या वतीने विकास गोगावले यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमास शिवसेना सह संपर्क प्रमुख प्रमोद गोगावले,युवासेना समन्व्यक इम्रान भाई पठाण, युवासेना तालुका प्रमुख रोहिदास ( पप्पा )अंबावले, शिवसेना उपतालुका प्रमुख तथा सरपंच संदीप झांजे, माजी राजीप सदस्य मनोज काळीजकर, शिवसेना विभाग प्रमुख गोपीनाथ सावंत, युवासेना सरचिटणीस शेखर राखाडे, नथुराम बांदल, नायक मराठा समाज निगडे विभाग अध्यक्ष शिवराम मालुसरे, युवासेना उप तालुका प्रमुख आशिष म्हस्के, प्रशांत खोपकर, ग्रामपंचायत सदस्य असणपोई अमित जाधव,सागर माने, विकास बांदल, महेश झांजे,उपस्थित होते.