उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून महाविद्यालय इमारती व वसतिगृहांचा आढावा
मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिनस्त शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये तसेच तंत्रनिकेतन व इतर शासकीय महाविद्यालयांच्या इमारती आणि वसतिगृहाचा आढावा घेण्याकरीता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उच्च व तंत्रशिक्षण शासकीय महाविद्यालयाच्या इमारती आणि वसतिगृहाचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कुठेही निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांनी बैठकीत दिली.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, वित्त व नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उपसचिव अशोक मांडे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.