महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थाकडून आयोजित ‘नारीदृष्टी’ उपक्रम माहितीपत्रकांचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनावरण

6

मुंबई : राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात महिला नेतृत्व अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA), पुणे यांच्या वतीने ‘नारीदृष्टी : Nurturing Visionary Women Leaders for Transformation in Academia’ हा विशेष नेतृत्व विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माहितीपत्रकाचे मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात अनावरण करण्यात आले.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, सहसंचालक अर्चना बोराडे उपस्थित होते.

दिनांक १५ ते १९ जून २०२६ दरम्यान महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA), पुणे येथे आयोजित करण्यात येणाऱ्या या निवासी कार्यक्रमात देशातील नामवंत कुलगुरू, शिक्षणतज्ज्ञ, धोरणकर्ते आणि विविध क्षेत्रांतील प्रेरणादायी महिला नेतृत्वकर्त्यांचे मार्गदर्शन सहभागींस लाभणार आहे.

कार्यक्रमाच्या मार्गदर्शकांमध्ये डॉ. भूषण पटवर्धन (कुलपती, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ, पुणे; माजी उपाध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग), प्रा. शशिकला वंजारी (कुलगुरू, राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था – NIEPA, नवी दिल्ली), कर्नल प्रा. हेमलता के. बगला (कुलगुरू, HSNC विद्यापीठ, मुंबई), डॉ. मनाली क्षीरसागर (कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ), डॉ. विद्या येरवडेकर (प्र-कुलपती, सिम्बायोसिस इंटरनॅशनल विद्यापीठ), डॉ. ज्योती जाधव (प्र-कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), वर्षा ठाकूर-घुगे (IAS) तसेच तेजस्वी सातपुते (IPS) यांचा समावेश आहे.

पाटील म्हणाले म्हणाले,उच्च शिक्षण संस्थांमध्ये महिलांची भूमिका अधिक व्यापक आणि प्रभावी होत आहे. अध्यापन, संशोधन आणि शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढत असला तरी नेतृत्वाच्या उच्च स्तरांवर त्यांचे प्रतिनिधित्वअधिक वाढावे यासाठीमहिलांच्या शैक्षणिक, प्रशासकीय आणि संस्थात्मक नेतृत्वासाठी आवश्यक दृष्टी, कौशल्ये आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या Project Based Learning या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थीकेंद्रित आणि अनुभवाधारित अध्यापन पद्धतींना चालना दिली जाणार आहे. Teaching Smart: Soft Skills, Life Skills and AI या कार्यक्रमातून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नव्या तंत्रज्ञानाचा अध्यापन प्रक्रियेत प्रभावी वापर तसेच २१व्या शतकातील आवश्यक कौशल्यांचा विकास यावर भर दिला जाणार आहे. तर CO-PO Integration and Micro-Planning for Outcome-Based Accreditation हा कार्यक्रम Outcome-Based Education तसेच NAAC आणि NBA मानांकन प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक नियोजन व अंमलबजावणीसंदर्भात मार्गदर्शन करणार आहे.राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वृद्धी, अध्यापनातील नावीन्य, शैक्षणिक नेतृत्व आणि संस्थात्मक उत्कृष्टता यांना चालना देण्यासाठी MSFDA मार्फत आयोजित करण्यात येणारे हे कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून इच्छुक प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी : www.msfda.ac.in

Get real time updates directly on you device, subscribe now.