राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीच्या कामाची मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी; कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

10

मुंबई : ज्ञान, संस्कृती आणि अभ्यासाची परंपरा अधिक सक्षम करणाऱ्या मुंबई येथील राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासंदर्भात आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी इमारतीतील विविध सुविधांची पाहणी करत उर्वरित फर्निचर व अंतर्गत सजावटीची कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. आधुनिक सुविधा, अभ्यासासाठी पोषक वातावरण आणि वाचनसंस्कृतीला चालना देणारे हे ग्रंथालय राज्यासाठी एक महत्त्वपूर्ण ज्ञानकेंद्र ठरणार आहे, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, ग्रंथालयाचे संचालक अशोक गाडेकर, बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.