खासदार श्रीरंग बारणे यांनी केली लोहगड किल्ल्यावरील कामे व शिवस्मारकाची पाहणी

मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्यावर भेट देऊन, पुरातत्व विभागाच्या वतीने चाललेल्या डागडुजी व संवर्धन कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या शिवस्मारकाला भेट देऊन छत्रपती शिवरायांचे दर्शन घेतले. किल्ल्याच्या संवर्धनासाठी स्थानिक नागरिकांची सहभागिता ही निश्चितच प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
या पाहणीवेळी पुरातत्व विभाग पुणे येथील गजानन मांढवरे, शिवप्रेमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन टेकाळे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शरदराव हुलावळे, युवासेना जिल्हा प्रमुख राजेंद्र तरस, मा.सभापती गणेश धानीवले, सौ.अलका धानीवले, शिवसेना उपतालुका प्रमुख राम सावंत, चंद्रकांत बोते, अमित कुंभार, युवासेना तालुका प्रमुख विशाल हुलावळे, सरपंच सौ.सोनालीताई बैवरे, उपसरपंच पंढरीनाथ विखार, सुनिल हगवणे, मुन्ना मोरे, दत्ता केदारी, नितीन देशमुख, राजू गुजर, कमलेश शेळके, सचिन भोरडे तसेच अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.