रोहित शर्माच्या वाढदिवसानिमित्त बार्शीत लागलेल्या बॅनरची जोरदार चर्चा

127

बार्शी – भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर आणि लोकप्रिय क्रिकेटपटू रोहित शर्मा याच्या वाढदिवसानिमित्त बार्शी शहरात शुभेच्छांचा बॅनर झळकला. शहरातील क्रिकेटप्रेमी तळेवाडी प्रतिष्ठानच्या वतीने हा आकर्षक बॅनर लावला असून, या बॅनरवर “Happy Birthday Rohit Sharma” असा संदेश झळकत आहेत. विशेषतः सुभाष नगर ताडसौंदणे रोड भागात बॅनरवर रोहितच्या क्रिकेट कारकिर्दीतील महत्त्वाच्या क्षणांचे फोटोही झळकत आहेत.

स्थानिक युवक गणेश मोहिते म्हणाले, “रोहित शर्मा आमच्यासाठी केवळ क्रिकेटपटू नाही, तर एक प्रेरणा आहे. त्याच्या शांत स्वभावाने आणि खेळातील कमाल खेळींनी आम्हाला नेहमीच भारावून टाकले आहे.” रोहित शर्मा सध्या आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो असून, चाहत्यांनी सोशल मीडियावरही त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

एरवी राजकीय सामाजिक नेत्यांच्या बॅनरने गजबजलेल्या ठिकाणी क्रिकेटप्रेमींचा हा बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे.

 

फोटो : प्रविण परदेशी

Get real time updates directly on you device, subscribe now.