पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी पंजाबमधील आदमपूर हवाई तळाला दिली भेट… हवाई योद्ध्यांची कौतुकाने पाठ थोपटली

69

पंजाब : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी पंजाबमधील आदमपूर हवाई तळाला भेट दिली. यावेळी ते वीर हवाई योद्धा आणि जवानांना भेटले. वायुदलाच्या बहाद्दर हवाई योद्ध्यांची नरेंद्र मोदींनी कौतुकाने पाठ थोपटली.

नरेंद्र मोदी आज या जवानांना भेटले. धैर्य, जिद्द आणि निर्भीडपणाचे प्रतीक असणाऱ्यांच्या सोबत असणे हा खूप खास अनुभव होता.

भारत आपल्या सशस्त्र दलाने आपल्या देशासाठी जे काही केले त्याबद्दल त्यांचे सदैव आभारी आहे, असे मत यावेळी मोदी यांनी व्यक्त केले.

आदमपूर हवाई तळ हा भारतीय हवाई दलाच्या मिग-29 चा तळ आहे. येथील स्क्वॉड्रनला ब्लॅक आर्चर्स म्हणून ओळखले जाते.

Get real time updates directly on you device, subscribe now.