थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी ११ जुलैपर्यंत मुदतवाढ; मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

6

मुंबई : थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या (Direct Second Year Diploma) प्रवेशासाठी जे विद्यार्थी वेळेत अर्ज सादर करू शकले नव्हते, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. विद्यार्थ्यांची वाढती मागणी विचारात घेऊन राज्य सरकारने अर्ज सादर करण्यासाठी ११ जुलै २०२६ पर्यंत अतिरिक्त मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

सदर प्रवेशप्रक्रियेसाठी उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन सादर करणे आणि त्याची निश्चिती करण्यासाठी ११ जुलै २०२६ ही अंतिम तारीख असणार आहे. या तारखेपर्यंत ज्या उमेदवारांचे नाव तात्पुरत्या गुणवत्ता यादीमध्ये (Provisional Merit List) आलेले नव्हते, परंतु त्यांनी ११ जुलैपर्यंत अर्ज निश्चित केला आहे, अशा सर्व पात्र उमेदवारांचा समावेश थेट १२ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम गुणवत्ता यादीमध्ये (Final Merit List) करण्यात येईल.

सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या वाढीव संधीचा लाभ घ्यावा आणि वेळेत आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक, नियम आणि अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या dte.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Get real time updates directly on you device, subscribe now.