डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात (DBATU) ‘इनक्युबेशन केंद्रा’चे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; तरुण तंत्रज्ञांच्या स्टार्टअप्सना मिळणार बळ

12

लोणेरे : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात (DBATU) विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक पंखांना बळ देणाऱ्या ‘इनक्युबेशन केंद्रा’चे (Incubation Center) भव्य उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गुरुवारी संपन्न झाले. या नाविन्यपूर्ण केंद्रामुळे विद्यापीठातील तरुण तंत्रज्ञांना आता स्वतःचे उद्योग सुरू करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. “विद्यार्थ्यांच्या मनातील सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रत्यक्ष उद्योग आणि व्यवसायाचे स्वरूप देण्यासाठी हे इनक्युबेशन केंद्र मैलाचा दगड ठरेल, असा मला पूर्ण विश्वास आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. या माध्यमातून विद्यापीठ स्तरावरच नव्या उद्योजकतेची मुहूर्तमेढ रोवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

स्टार्टअप्ससाठी मिळणार हक्काचे व्यासपीठ

या नवनवीन इनक्युबेशन केंद्रामुळे महाविद्यालयातील तरुण तंत्रज्ञांना आपले स्टार्टअप्स (Startups) सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तांत्रिक सहकार्य, पायाभूत सुविधा आणि निधी मिळवण्याचे हक्काचे माध्यम मिळणार आहे. या स्तुत्य आणि महत्त्वपूर्ण उपक्रमाबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठ प्रशासन, प्राध्यापक आणि उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक कौतुक केले व त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, DBATU चे कुलगुरू रजनीश कामत, कुलसचिव प्रा. अमित शेष आणि विद्यापीठातील माझे तरुण विद्यार्थी मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.