अमोल कोल्हे – राज ठाकरे सदिच्छा भेट

3

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. सकाळी अमोल कोल्हे ‘कृष्णकुंज’वर दाखल झाले. अमोल कोल्हे यांनी राज ठाकरे यांची भेट का घेतली याबाबत उत्सुकता होती. 

अमोल कोल्हे आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजप विरोधात जोरदार प्रचार केला होता. त्यांनी केलेल्या सभांना प्रचंड गर्दी झाली. मात्र निकाल भाजपच्या बाजूने लागला. पण शिरुर मध्ये अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे दिग्गज उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. या विजयात राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेचा परिणाम दिसून आला, अशी भावना अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.

अमोल कोल्हे म्हणाले, “ही सदिच्छा भेट होती. राज ठाकरे यांच्या सभेचा चांगला इम्पॅक्ट झाला. त्यासाठीच राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी, त्यांची भेट घेतली.”  

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!