गैरकारभार कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही –  आ. चेतन तुपे 

88 7,268

मागील काही काळात  पीएमपीएमएलने   200 नवीन मीडी बसेस विकत घेतल्या  होत्या त्यातील काही बसेस शेवाळवाडी येथील डेपोमध्ये उभ्या ठेवल्या आहेत. नवीन असलेल्या बस बंद पडतात, त्या अजून वारंटी मध्ये देखील आहेत, तरी सुद्धा त्यांची दुरुस्ती करण्यात येत नाही कि  पीएमपीएमएल प्रशासन दुरुस्ती न करता वॉरंटी संपण्याची वाट पाहत आहे का ? असा सवाल हडपसर विधानसभेचे आमदार आणि राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष चेतन तुपे यांनी उपस्थित केला आहे. 


 “आधीच बसेस कमी आहेत,त्यात जुन्या बस रस्त्यावरती आणि नवीन बसेस उभ्या असा अजब कारभार पुण्यामध्ये चालू आहे. काही लोकांनी मला तक्रार केल्यानंतर मी स्वतः आमदार या नात्याने त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणि या तक्रारीत मला तथ्य आढळले. पुणेकरांची गैरसोय करण्यात कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत याचा छडा लावला गेला पाहिजे. इथे प्रश्न सुटला नाही तर वेळप्रसंगी हा प्रश्न विधानसभेत सुद्धा मांडू पण हा चाललेला गैरकारभार कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही. पुणेकरांचे हित प्रथम हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कायम भूमिका आहे,” अशी तंबी आमदार चेतन तुपे यांच्या कडून उपस्थित  पीएमपीएमएल अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस या प्रश्नावर पुढे किती आक्रमक होते हे काही दिवसात कळेल. 

Get real time updates directly on you device, subscribe now.