पत्रकारांना 50 लाखांचे विमा कवच द्या, कॉंग्रेस खासदाराची मागणी

14

हिंगोलीचे खासदार, कॉंग्रेस नेते राजीव सातव यांनी कोरोनाच वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना 50 लाखांचे विमा कवच व नातेवाईकांना 15 लाखांचे सानुग्रह अनुदान देणाची विनंती महाविकास आघाडी सरकारकडे पत्राद्वारे केली.

राज्यात कोरोनाच्या लढ्यात पोलीस, आरोग्यकर्मचारी, डॉक्टर यांच्या सोबतच, कोरोनाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपला जीव धोक्यात घाऊन आज अनेक पत्रकार घडामोडींचे वार्तांकन करत आहेत, काही दिवसांपूर्वी पत्रकारांच्या कोरोना टेस्ट देखील पोझिटिव्ह आल्याचे निदर्शनास आले होते, याच अनुषंगाने करण्यात आलेल्या या मागणीला महाविकास आघाडीचे सरकार किती प्राधान्य देणार हे पुढील काळात स्पष्ट होईल.